न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०१९) :- संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आगमन झाले. या सोहळ्यात दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी शहर काँग्रेसच्या वतीने दिंडीत सहभागी वारकऱ्यांना फळे वाटपाचा कार्यक्रम आयोजीत केला होता. यावेळी पिंपरी चिंचवड काँग्रेस कमिटी व असंघटित कामगार काँगेसच्या वतीने वारकऱ्यांना शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते फळवाटप करण्यात आले.
याप्रसंगी माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, राष्ट्रीय सेवादल सचिव संग्राम तावडे, असंघटित कामगार सेल अध्यक्ष सुंदर कांबळे, महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस मयूर जयस्वाल, पिंपरी चिंचवड काँग्रेस सेवादल अध्यक्ष मकरध्वज यादव, पिंपरी युवक अध्यक्ष हिरा जाधव, बाबा बनसोडे, शोभा कोराटे, शीतल कोतवाल, विनिता तिवारी, विशाल कसबे, अण्णा कसबे, लक्ष्मण रुपणर, रमजान अत्तर, नितीन पटेकर, तारीक सय्यद, फातिमा शेख, शोभा मिरजकर, अडँ ज्ञानेश्वर राऊत, मोहन अडसूळ, आशा खरात, निर्मला कुसाळकर, सविता धाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन असंघटीत कामगार काँग्रेस शहराध्यक्ष सुंदर कांबळे यांनी केले.











