न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जून २०१९) :- भाजपाच्या मध्यवर्ती कार्यालयात मनपा आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्या उपस्थितीबाबत शहर युवक काँग्रेस ने आयुक्तांचा निषेध करत त्यांना भाजपामध्ये जाहीर प्रवेश करण्याचा खोचक सल्ला दिला. त्यांच्या या कृत्याबाबत त्यांनी शहरवासियांची जाहीर माफी मागून, राजीनामा द्यावा, असेही युवक काँग्रेसने पत्राद्वारे आयुक्तांना सांगितले आहे.
याबाबतचे निवेदन पिं. चिं. मनपा अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांना देण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे, एनएसयूआय चे माजी अध्यक्ष मनोज कांबळे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, भोसरी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नासीर चौधरी, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हिराचंद जाधव आदि पदाधिकारी उपस्थित होते.











