न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- भोसरी पोलिसांनी बंदुकीचा धाक दाखवत हॉटेल व्यवस्थापकाला धमकी देणाऱ्या एका शिक्षण संस्था चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. इंद्रायणीनगरमधील स्वामी समर्थ शाळेचा तो संस्थापक व संचालक आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रायणीनगरमधील पूजा रेस्टॉरंट अँड बार या हॉटेलचे व्यवस्थापक अशोक शेट्टी यांना आरोपी याने १४ ऑगस्ट रोजी हॉटेलमध्ये येऊन हॉटेलसमोरील गार्डनची जागा वापरायची नाही ती जागा वापरल्यास तुला बघून घेईन, अशी धमकी दिली व काउंटरजवळ असलेली परवानाधारक रिव्हॉल्वर बळजबरीने घेऊन परिसरात दहशत माजवली. पुढील तपास भोसरी पोलीस करत आहेत.













