न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रावेत प्रतिनिधी :- पिंपरी-चिंचवड पोलिसांनी रावेत परिसरातील किवळे येथील एका लॉजवर छापा मारून वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या आरोपींना अटक केली आहे.
या आरोपींवर स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाई पथकामध्ये पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपाली मरळे, सहाय्यक पोलीस फौजदार भीवसेन सांडभोर, दीपक लोखंडे, पोलीस हवालदार प्रमोद वेताळ, कैलास बोबडे, राजेश परंडवाल, संतोष बर्गे, प्रमोद लांडे, आप्पा कारकुड, राजेंद्र शेटे, पोलीस नाईक अमित गायकवाड, हेमंत खरात, पोलीस शिपाई प्रमोद हिरळकर, सुनील चौधरी, प्रदीप गाडे आदी सहभागी झाले होते. पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी या टीमचे कौतुक केले आहे.


















