न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जून) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रिझवाना पठाण या दीर्घकाळ गैरहजर राहिल्याने त्यांना महापालिका सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गुरूवारी (दि. २७) रोजी याबाबतचा आदेश दिला.
डॉ. पठाण या ११ डिसेंबर २०१४ ते १६ जून २०१५ असे १८८ दिवस, २६ फेब्रुवारी २०१६ ते १९ मे २०१६ असे ८४ दिवस आणि १३ फेब्रुवारी २०१७ ते २७ सप्टेंबर २०१७ या कालावधीत २२९ दिवस, असे एकूण ५०१ दिवस गैरहजर होत्या. त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात आली. दिलेल्या नोटीशीला त्यांनी उत्तर दिले नाही. शिस्तभंग केल्याने त्यांना सेवेतून काढून टाकले असून, त्यांची १ लाख रुपयांची बँक गॅरटी जप्त करण्यात आली आहे.











