न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जून) :- हॉर्न वाजवल्याच्या वादातून गावठी कट्ट्याचा धाक दाखवून एका रिक्षाचालकाचे अपहरण करण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी त्याची सुटका केली. ही घटना मंगळवारी (दि. २५) रात्री साडेअकराच्या सुमारास खराळवाडी येथे घडली.
सोमेश्वर संगम गिरी (२१, रा. कासारवाडी) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी हितेश प्रल्हाद खेदार (२१, रा. लांडगेवस्ती, कासारवाडी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, राजेश विष्णु धोत्रे (२४, रा. भगवत गिता मंदिराजवळ, खराळवाडी) याला अटक करण्यात आली आहे.











