न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जून) :- शिवसेना पक्षप्रमख मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार ‘माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र’ अभियाना अंतर्गत १ लाख शाखा प्रमुख नेमणुका व शाखा सक्षमीकरण मोहिमे अंतर्गत मावळ लोकसभा क्षेत्रातील मावळ, पिंपरी व चिंचवड विधानसभा क्षेत्रामधील अभियानाचा शुभारंभ ठाकरे कुटुंबीयांचे कुलदेवत आई एकवीरेचे दर्शन घेऊन एकवीरा मातेच्या गडाच्या पायथ्याशी वेहेरगाव येथे पहिल्या शाखेच्या फलकाचे उद्घाटन शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख बाळाभाई कदम, जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमानंतर शिवसेना मावळ तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी बैठक कार्ला फाटा येथील गुलाब पॅरेडाइस याठिकाणी झाली.
या बैठकीमधे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल तालुक्यातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांचे संपर्क प्रमुख बाळाभाई कदम यांनी कौतुक केले. यावेळी सर्व पदाधिका-यांना जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे, संपर्क प्रमुख गणेश जाधव, जिल्हा संघटीका महिला आघाडी शादान चौधरी, तालुका संघटीका शैला खंडागळे, तालुका प्रमुख राजूभाऊ खांडभोर यांनी मार्गदर्शन केले.
शिवसेना नेते व पदाधिकारी यांनी या भगव्या सप्ताहामध्ये प्रभाग निहाय, वॉर्ड निहाय शाखा स्थापनेमध्ये व शाखेतील कामकाज समाजभिमुख होण्यासाठी एकत्रित नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखाणी करून काम करण्याचे ठरले.
या कार्यक्रमास शिवसेना मावळ तालुका संघटक सुरेश गायकवाड, संघटक अंकुश देशमुख, उपतालुका प्रमुख आशिष ठोंबरे, मदन शेडगे, मा. सभापती शरदराव हुलावळे, युवासेना मावळ प्रमुख अनिकेत घुले, युवती सेना तालुका अधिकारी दिपाली ताई भिलारे, देहूरोड शहर प्रमुख महेश धुमाळ, नगरसेवक शिवदास पिल्लै, म. शहर संघटक सुनंतदाताई आवळे, विभागप्रमुख काळु हुलावळे, उपविभागप्रमुख संतोष बोंबले, अविनाश शिंदे, उपशहरप्रमुख संजय भोईर, मनीष पवार, राहुल भिलारे, तालुक्यातील सर्व शिवसैनिक व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.











