न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील जैवविविधतेचा सर्वेक्षण करण्यात आले होते. याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याचे सादरीकरण सोमवारी (दि. १) रोजी सकाळी ११.०० वाजता पालिका भवनातील मधुकरराव पवळे सभागृहात करण्यात येणार आहे.
हे सर्वेक्षण मुंबईतील टेरेकॉन इकोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत करण्यात आले. पालिका जैवविविधता व्यवस्थापन समिती तसेच, शहरातील पर्यावरणप्रेमी नागरिक, संस्था यांच्याकडून ४ फेब्रुवारी २०१९ पर्यंत प्राप्त झालेल्या सूचनांचा अंतर्भाव करून हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे.
हा अहवाल सोमवारी सादर केला जाणार आहे. या वेळी पालिकेचे अधिकारी नगरसेवक, पर्यावरणप्रेमी व संस्थांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांनी केले आहे.











