न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जून २०१९) :- पिंपरी येथील ॲड. जया उभे यांना दिल्ली येथील विश्वकर्मा विद्यापीठाच्या वतीने डॉक्टरेट पदवीने गौरवण्यात आले आहे. ॲड. जया उभे यांनी वकिलीसोबतच राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, मराठी, अर्थशास्त्र आदी विषयांमध्ये पदवी संपादन केली आहे.
त्याचबरोबर सायबर लॉ, टैक्सेशन, बिझनेस लॉं या विषयांचेही त्यांनी शिक्षण घेतले असून, सध्या हे विषय विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. याबरोबरच त्या कामगार कायदा, निवडक मालमत्ता अधिकार व व्यवसाय कर विषयीचे मार्गदर्शन ही करीत असतात.

या सर्व पदव्या बरोबरच जया उभे यानी इंग्रजी, संस्कृत, उर्दू, कन्नड या भाषा तसेच मोडी लिपीचे ज्ञान संपादन केले आहे. ॲड. जया उभे यांचा विविध सामाजिक कार्यातही मोठ्या प्रमाणात सहभाग असतो .या सर्व बाबींचा विचार करीत त्यांना विश्वकर्मा विद्यापीठाच्या वतीने डॉक्टरेट पदवीने गौरवण्यात आले आहे.















