न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जून २०१९) :- निगडी येथील सिध्दार्थ नगर झोपडपट्मटीधील एका घरातून पोलिसांनी छापा मारुन ३ लाख ४५ हजार ४५० रुपये किंमतीचा साडेसोळा किलो गांजा जप्त केला आहे. ही कारवाई (दि. २७) रोजी सांयकाळी साडेसात वाजताच्या सुमारास करण्यात आली.
या कारवाईत पोलिसांनी मंटू चंद्रभूषन पासवान (वय ४६, रा. भाजी मंडईजवळ, आझाद चौक, निगडी) याला पोलिसांनी अटक केली आहे. सोनाबाई पवार (रा. सिध्दार्थनगर झोपडपट्टी) या फरार झाल्या आहेत. त्यांच्यावर पोलिसांनी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी येथील सिध्दार्थनगर झोपडपट्टीमधील सोनाबाई पवार यांच्या घरात मोठ्या प्रमाणात गांजा असल्याची माहिती खब-यांकडून पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी सोनाबाई पवार हिच्या घरावर छापा मारला असता, घरात साडेसोळा किलो वजनाचा गांजा (किंमत ३ लाख ४५ हजार ४५० रु) हस्तगत केला. या प्रकरणात पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत मंटू पासवान याला अटक केली. तर, सोनाबाई पवार यांचा पोलीस शोध घेत आहेत. तपास पोलीस निरीक्षक निकाळजे करीत आहेत.















