न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जून २०१९) :- फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन च्या वतीने उद्योजकांनी आज शनिवार (दि. २९) जून रोजी भोसरी एमआयडीसी येथील कॅनरा बँकेचे एसएमई ब्रांच, पुणे MSME चे सहायक सर-व्यवस्थापक सुलभ संजय कुमार तसेच, शाखा व्यवस्थापक नागेश बिलवा आणि विपणन व्यवस्थापक सनी सिंग यांची भेट घेऊन स्टार्टअप, मुद्रा लोन, स्टॅंडर्ड योजनांबाबत चर्चा केली व या सुविधा बँकेने उद्योजकांना उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी केली.
फोरमचे अध्यक्ष अभय भोर, उद्योजक व बँकांच्या प्रतीनिधींबरोबर बैठक पार पडली. यावेळी उद्योजकांच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले. सहायक सर-व्यवस्थापक संजयकुमार यांनी उद्योजकांना दिलासा दिला व सर्वपरीने बँक त्यांना मदत करण्यास तयार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी बँकेच्या काही योजना उद्योजकांना सांगितल्या व त्याचा लाभ सर्व उद्योजकांनी घ्यावा, असे आवाहन केले.
भोर म्हणाले की, सध्या उद्योजक मंदीने हैराण आहेत. बऱ्याच उद्योजकांना यावेळी सरकारी योजनेचा फायदा करून दिल्यास ते पुन्हा आपले उद्योग चांगल्या प्रकारे चालू शकतील व खऱ्या अर्थाने या योजनांचा फायदा उद्योजकांना होऊन नवीन उद्योजक तयार होतील. तसेच लवकरच फोरम व बँकेच्या प्रतिनिधींसोबत उद्योजकांची बैठक आयोजित करून, त्यांच्या अडचणी समजून विशेषतः महिला उद्योजकांना आणि फोरमतर्फे राबविण्यात येत असलेली समूह ग्रुप योजना यांना प्राधान्य दिले जाईल.
यावेळी ऑटो टेक्नॉलॉजी सिस्टीम, पुना बेरिंग प्रायव्हेट लिमिटेड, अल्फा हीट लिमिटेड, पुना व्याक्युम हिट लिमिटेड, पॅकेजिंग एस के इंटरप्राईजेस, वैष्णवी इंटरप्राईजेस, कल्याणी इनोव्हेटिव्ह, अहिंसा इंटरप्राईजे, साई इंडस्ट्रीज, सोनू ओहरी इत्यादी कंपन्यांचे उद्योजक उपस्थित होते.















