न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जून २०१९) :- शत्रुघ्न (बापु) काटे युथ फाउंडेशन, उन्नती सोशल फाउंडेशन व जयनाथ शेठ काटे युथ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने १० वी १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून त्यांचा गुणगौरव करण्यात आला.
पिंपळे सौदागर येथील बासुरी बँक्वेट हॉल, गोविंद गार्डन या ठिकाणी शत्रुघ्न (बापु) काटे युथ फाउंडेशन, उन्नती सोशल फाउंडेशन व जयनाथ शेठ काटे युथ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने १० वी १२ वी च्या परीक्षेत प्रवीण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिमी पंडिता यांनी विद्यार्थ्यांना करिअर विषयी मार्गदर्शन केले. तसेच दहावी बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मोबाईल, टॅब, घड्याळ देण्यात आले. तसेच परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना पेन, वही, स्कूल बॅग इत्यादी शालेय उपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात आले.
यावेळी पवना सहकारी बँकेचे व्हॉइस चेअरमन जयनाथ काटे, नगरसेवक शत्रुघ्न (बापु) काटे, उन्नति सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे, संस्थापक संजय भिसे, नगरसेविका निर्मलाताई कुटे, यशदा रियालिटी ग्रुपचे चेअरमन वसंत काटे, पी. के. इंटरनॅशनल स्कुलचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ काटे, स्वीकृत सदस्य संदीप नखाते, गोपाळ माळेकर, विजय भिसे, भानुदास काटे-पाटील, विजय धनवटे, राजेंद्र जयस्वाल, रामप्रकाश वासन, कैलास काटे, विकास काटे, सतीश काटे, रमेश वाणी, झोपे काका, विलास नगरकर काका,अर्चना भालेराव, निलेश कुंजीर, प्रवीण कुंजीर, गणेश झिंजुर्डे, सुभाष भिसे, कमलेश काटे, काळूराम झिंजुर्डे,गिरीश रोहिडा,संदिप फुके,राज सोमवंशी,बाळासाहेब परघळे, गणेश अमराळे, विकास(भोला)काटे विविध शाळांतील विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर बिरारी यांनी केले.















