न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ जुलै २०१९) :- राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या पालिकेच्या शिक्षण समिती प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांची राज्य शासनसेवेत बदली करावी. त्यांना महापालिकेच्या सेवेतून कार्यमुक्त करण्यात यावे, अशी मागणी भीम संग्राम सामाजिक संघटनेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीला भीम संग्राम सामाजिक संघटनेच्या वतीने तीन लेखी निवेदन दिले आहे. त्यांना भेटण्यासाठी आमचे शिष्टमंडळ गेले होते. त्यांची वाट बघूनही त्या भेटल्या नाहीत. त्यामुळे नाईलाजाने शिक्षण समितीच्या टपालात निवेदन द्यावे लागले आहे. आयुक्तांनाही निवेदन दिले आहे.
त्यानंतर आयुक्त कार्यालयाकडून शिंदे यांना निवेदनावर कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. तरीही शिंदे कार्यवाही करताना दिसत नाहीत. ते दुय्यमपणाची वागणूक देत आहेत. त्यामुळे त्यांना पालिका सेवेतून कार्यमुक्त करावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.















