न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ जुलै २०१९) :- शिरूर तालुक्यातील धामारी येथील आदर्श माता कै. श्रीमती बबुबाई तुकाराम इफळ (वय ८५ वर्षे) यांचे मंगळवार (दि. २५ जून) रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने पंचक्रोशीतील परिचित नागरिकांमध्ये दुःखाचे सावट पसरले आहे.
त्यांचा दशक्रिया विधी गुरूवार (दि. ४ जुलै) रोजी स. ८ वा. धामारी गावातील खंडोबा मंदिरामागे होईल. यावेळी हभप श्री. माऊली पिंगळे महाराज, पाबळ यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे.
चिखलीतील आयआयबीएम कॉलेजच्या प्रशिक्षिका प्रतीक्षा डफळ यांच्या त्या आजी होत.











