न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जुलै २०१९) :- पुण्यातल्या काही विद्यार्थ्यांनी ‘बॅटमॅन’ या प्रसिद्ध हॉलिवूडपटातील ‘बॅट मोबिल टम्बलर’ ही भन्नाट कार तयार केली आहे. झील कॉलेजमधील बीई मॅकनिकेलच्या तिसर्या वर्षातील विद्यार्थ्यांनी देशात पाहिल्यांदाच अशी कार साकारली आहे.
स्वप्नातल्या या कारला मूर्त रुप देणारा विद्यार्थी सिद्धेश शिंदे याने सांगितले, कॉलेजमध्ये आम्हाला अशी कार तयार करण्याचा प्रोजेक्ट देण्यात आला होता. यावर माझ्यासह इतर १२ विद्यार्थ्यांनी विस्तृत चर्चा केली त्यानंतर आम्ही ‘बॅटमॅन’ या चित्रपटातील बॅट मोबिल टम्बलर कार तयार करण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर अनेक स्पोर्ट्स कार पाहिल्यानंतर ५५ दिवसांच्या मेहनतीनंतर ही कार तयार करण्यात आम्हाला यश आले. ही कार बनविण्यास ३ लाख ५८ हजार रुपयांचा खर्च आला असून शहरातील रस्त्यावर धावणे या कारसाठी अशक्य आहे. केवळ हायवेवरच ती चांगल्या प्रकार धावू शकते. या कारचे मायलेज प्रतिलिटर १२ किलोमीटर इतके आहे, अशी माहितीही सिद्धेशने दिली.











