न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जुलै २०१९) :- लोणावळ्यातील कार्ला या ठिकाणी एकविरा देवीच्या मंदिराशेजारी दरड कोसळल्याची घटना घडली. घटनेत कोणतीही जीविहानी झालेली नसून जखमी झालेलं नाही. दरम्यान, प्रशासनाकडून सैल झालेल्या दरड काढण्याचे काम सुरू आहे.
गेल्या काही दिवसांपासून लोणावळा आणि मावळ परिसरात दमदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडत आहेत. आज सकाळी आई एकविरा देवी मंदिराच्या काही फुटांवर सैल झालेली दरड कोसळली यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कार्ला लेणी पुरातन असून अनेक ठिकाणी दगड सैल झालेले आहेत.
त्यामधील एक दरड कोसळली आहे. दरम्यान, ते काढण्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे. दररोज या ठिकाणी आई एकविराच्या दर्शनाला भाविक येत असतात सोबत लेणी देखील पाहतात त्यामुळे आज घडलेल्या घटनेत त्या ठिकाणी कोणी नसल्यामुळे अनर्थ टळला.











