न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जुलै २०१९) :- महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या उन्हाळी परीक्षा २०१९ चा निकाल जाहीर झाला असुन त्यात डी फार्मसी जेएसपीएम जयवंत इन्स्टीटयुट ऑफ फार्मसी, ताथवडे या विभागाच्या विद्यार्थ्यानी घवघवित यश मिळविले आहे़. महाविदयालयातील विद्यार्थ्यांनी उत्त्तुंग भरारी घेतली व महाविदयालयाचा निकाल अनुक्रमे प्रथम वर्ष डी. फार्मसी चा ८८.३३ % व द्वितीय वर्ष डी फार्मसी चा ८८.२४ %
महाविदयालयातील द्वितीय वर्षातील समृद्धी मुरकुटे हीने ९३.८० टक्के गुण मिळवुन पुणे विभागात प्रथम व महाराष्ट्रात दिवितीय येवुन संस्थेचा व महाविदयालयाचा नावलौकीक वाढविला. महाविदयालयात द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांंतील एकुण ६७ % विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्यसह मिळविले आहे. द्वितीय वर्षात कु. समृद्धी मुरकुटे ९३.८० (प्रथम), कु. दीव्या चौधरी ९२ % (द्वितीय), कु. नेहा खान ८९ % (तृतीय) आणि प्रथम वर्षात कु. सिध्दी थोरात ९०.५५ % (प्रथम), कु. संतोषी चौधरी ९०.१८ % (द्वितीय), कु. भावना चौधरी ८८.८२ % (तृतीय) गुण मिळविले आहेत.
संस्थेचे संस्थापक म. रा. जलसंधारण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी कु. समृद्धी मुरकुटे व सर्व यशस्वी विद्यार्थ्यांंचे अभिनंदन केले. महाविदयालयातील सर्व विद्यार्थ्यांना कम्ॅपस डायरेक्टर प्रा. एस एल भिलारे, इस्टेट डायरेक्टर रवी सावंत, प्राचार्य पी. पी. हंबर आणि शिक्षकांनी मार्गदशन केले आणि पुढील उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.


















