न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड नवनगर, विकास प्राधिकरणाच्या आकुर्डी येथील कार्यालयात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे शुक्रवारी (दि. ५) रोजी सकाळी १० वाजता बैठक घेणार आहेत.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण यांच्या प्रकल्पाचा आढावा दोन स्वतंत्र बैठकांमध्ये घेण्यात येणार आहे. सुरुवातीला पीएमआरडीएच्या बैठकीत पीएमआरडीएतर्फे सुरू असलेले प्रकल्प आणि भविष्यातील नियोजित प्रकल्पांचा आढावा बैठक होईल.
त्यामध्ये प्रामुख्याने वाल्हेकरवाडी गृहप्रकल्प, पेठ क्रमांक १२ मधील गृहप्रकल्प, मोशी येथील खुल्या प्रदर्शन केंद्राचे सुरू असलेले काम, पेठ क्रमांक सहा मधील नियोजित प्रकल्प यावर चर्चा होईल. तसेच, पेठ क्रमांक १२ मधील मोकळ्या जागेत विकसित करण्यात येणारे उद्यान, क्रीडांगण, क्लब हाऊस व अन्य विकासकामांबाबत या बैठकीत माहिती दिली जाणार आहे. पाटील यांची प्राधिकरण कार्यालयात ही पहिलीच बैठक आहे.















