न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागातर्फे शहरात पर्यावरणविषयक जागृती करण्यासाठी भिंती रंगविण्यात येणार आहेत. त्यासाठी येणा-या ६२ लाख १ हजार ८८१ रुपये खर्चास स्थायी समीतीने नुकतीच मंजुरी दिली.
या अंतर्गत फलक बसविणे, भिंती रंगविणे व इतर आवश्यक कामे केली जाणार आहे. हे काम ओम एंटरप्रायजेस देण्यात आले आहे. या कामात २० लाख ८४ हजारांचे वाढीव खर्चास स्थायीने मान्यता दिली आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी दिली.















