- प्राधिकरणात “नक्षत्र” वृक्षांची लागवड
- प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीच्या वृक्षारोपण उपक्रमास नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ जुलै २०१९) :- गेल्या आठवड्यापासून शहरात पावसाची रिमझिम सुरू आहे. या निमित्ताने प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पर्यावरण विभागाने आज रोजी परिसरामध्ये सेक्टर २८ तसेच संत ज्ञानेश्वर उद्यानानाध्ये नक्षत्र वृक्षांची लागवड केली
या प्रसंगी प्रमुख उपस्थिती मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते सागर पाबळे, राहुल रांजणे, समिती अध्यक्ष विजय पाटील, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मनोहर दिवाण, महिला अध्यक्षा अर्चना घाळी, दाभोळकर, संपर्क प्रमुख विजय मुनोत, नाना कुंबरे, अँड विद्या शिंदे, देवयानी पाटील, संतोष चव्हाण, विशाल शेवाळे, अमित डांगे, बाबासाहेब घाळी, विभावरी इंगळे, गौरी सरोदे, तेजस सापरिया यांची होती.
प्राधिकरणात पेठ क्रमांक २८ व संत ज्ञानेश्वर उद्यान येथे पर्यावरण पूरक नक्षत्र वृक्ष वड, पिंपळ, कडुलिंम्ब, जांभूळ, आंबा, बेल, उंबर, कदंब या वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच पूर्ण वाढ होईपर्यंत वृक्षमित्र म्हणून समिती सदस्यांना देखभालीसाठी प्रत्येक वृक्षाची जबाबदारीही देण्यात आली.
वृक्ष मित्र म्हणून सुनिल चौगुले, जयप्रकाश शिंदे, मनोज ढाके, सुलभा धांडे, अजय घाडी, सुकेश येरूनकर, राहुल लुगडे, कपिल पवार, गणेश वाशिवले, वैशाली पवळे, मौसमी घाळी, पांडुरंग ताकधुंदे, जया शेखावत, सुजीत पानसे, हृषीकेश साळी, सुनील सुतार, संदिप जाधव, निवृत्ती सपकाळ, महेंद्र जोरी, राजू निबुदे, खंडू थोरात, अनिल मेंगडे, ओंकार घोलप हे वृक्ष जतन आणि संवर्धनाची जबाबदारी पार पाडणार आहेत.
या प्रसंगी अभिनेते सागर पाबळे म्हणाले,” महाराष्ट्रातील दुष्काळ समूळ नष्ट करण्याकरिता संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होणे आवश्यक आहे. त्याचबरोवर समितीचे असे वृक्षमित्र वृक्षांचे जतन आणि संवर्धनही करणार ही हरित प्राधिकरणासाठी अभिमानास्पद गोष्ट नक्कीच आहे. ह्यापुढेही माझ्या कलाकार मित्रांसोबत वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी होणार आहे.’











