न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ जुलै २०१९) :- टाटा मोटर्स कंपनीने पीएमपीएमएलला निश्चित मुदतीमध्ये बसपुरवठा न केल्याने पीएमपीएमएलने कंपनीस कारणे दाखवा नोटीस बजावली होती. पीएमपीएलने २०० सीएनजी बसेस थेट पद्धतीने येथील टाटा मोटर्स कंपनीकडून खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. अटी व शर्तीनुसार कंपनीने करार न पाळल्यामुळे प्रतिदिन प्रतिबस दंडही ठोठावला होता.
याबाबत टाटा मोटर्स लि. च्या अधिकृत प्रवक्त्याने पीएमपीएमएल च्या सीएनजी बसेसच्या बाबतीत स्पष्टीकरण दिले आहे. याबाबत त्यांनी म्हटले आहे की, टाटा मोटर्सला अभिमान आहे. ते पीएमपीएमएल ह्या एका मोठ्या मानांकित ग्राहकाशी संलग्न आहेत. कंपनीला ही निविदा मिळाल्यानंतर ती पूर्णत्वास नेण्यास व त्या वेळेवर देण्यास कटिबद्ध आहे.
निविदेप्रमाणे बसेसचे उत्पादन हे कंपनीच्या लखनऊ कारखान्यात निविदेमध्ये नमूद केलेल्या सूचनांप्रमाणे करण्यात आले. ह्या कालावधीत पीएमपीएमएलकडून अनेक वेळा चालू असलेल्या कामामध्ये चाचण्या करण्यात आल्या. पीएमपीएमएलकडून त्यावेळेस सुचविण्यात आलेले बदल व अतिरिक्त गोष्टींचा समावेश कंपनीकडून करण्यात आला. पीएमपीएमएल कडून अंतरित चाचणी झाल्यानंतर ७४ बसेस ह्या पुण्याकडे पाठविण्यात आल्या. पुढील आठवड्यापासून पुढील पुरवठा चालू करण्यात येईल.
पीएमपीएमएल ला कळविल्यानुसार टाटा मोटर्स पुढील चार महिन्यात ४०० बसेस देणार आहे, त्यांनी म्हटले आहे.











