न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ जुलै २०१९) :- टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनच्या निवडणुकीत कामगारांनी ३१ उमेदवारांना निवडून आणले. त्यात तब्बल २१ नवख्या उमेदवारांचा समावेश आहे.
या प्रतिनिधींमधून युनियनच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा निवडणूक कार्यक्रम आज शुक्रवार (दि. ५) रोजी पार पडला. गुप्तमतदान पध्दतीने पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.
या निवडणुकीत प्रथमच निवडून आलेले कामगार प्रतिनिधी व जुने प्रतिनिधी मिळून ३१ प्रतिनिधींनी मतदानाचा हक्क बजावला. यात अध्यक्षपदी सचिन लांडगे, कार्याध्यक्षपदी अशोक माने, जनरल सेक्रेटरीपदी संतोष दळवी यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष सचिन लांडगे यांचा पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर राहुल जाधव यांनी शुभेच्छ्या देत सत्कार केला.











