न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ जुलै २०१९) :- शिवसेनेच्या वतीने मावळ तालुक्यात अंदर मावळामध्ये भोयरे, वडेश्वर नागाथली व कान्हेफाटा येथे पीकविमा मदत केंद्रे उभारण्यात आली. मावळ तालुक्यातील शेतकर्यांच्या पीकविमा योजने संदर्भात असलेल्या अडी-अडचणी व तक्रारी संदर्भात शिवसेना पदाधिकारी यांच्याकडे पुढील पीकविमा केंद्र निहाय जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
कार्ला केंद्र – शरद हुलावळे, कान्हेफाटा केंद्र – मदन शेडगे, वडेश्वर नागाथली केंद्र – हणमंत ठाकर, भोयरे केंद्र – विलास अडीवळे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली असून समन्वयक म्हणून तालुका प्रमुख राजू खांडभोर, शरद हुलावळे, सुनील शिंदे, यशवंत तुर्डे, जयदास ठाकर हे केंद्र निहाय आढावा घेऊन शेतकर्यांनी पीकविमा उतरविण्यासाठी २४ जुलै २०१९ ही अंतीम तारीख असल्याने भात, नाचणी, भुईमुग क्षेत्रामधील शेतकर्यांनी जास्ती जास्त पीकविमा उतरविण्यासाठी व मागील वर्षीच्या पीकविम्याच्या माध्यमातून तक्रारदार शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीकडे योग्य तो पत्रव्यवहार, पाठपुरावा शिवसेनेच्या वतीने करण्याबाबत जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांनी मार्गदर्शन केले व पीकविमा केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन भेटी दिल्या.











