न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ जुलै २०१९) :- अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा पुणे व सोलापूर कार्यालया अंतर्गत बिज भांडवल व अनुदान योजनेच्या प्रातिनिधिक स्वरूपात ९ लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या बिजभांडवल रक्कमेच्या धनादेशांचे वाटप आज शुक्रवार (दि. ५) रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे हस्ते आणि महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांच्या उपस्थितीत केले.
आकुर्डीतील पिंपरी-चिंचवड प्राधिकरण कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दिलीप खुडे, शिवाजी मांजरे, एन.एम. वाघमारे, एल. ए. क्षीरसागर यांच्यासह जिल्हा व्यवस्थापक महामंडळाचे कर्मचारी, लाभार्थी आदी उपस्थित होते.















