न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ जुलै २०१९) :- देहूरोड येथील मिलिटरी कॅम्पमधील जवानाने स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार (दि. ५) रोजी दुपारी पावणे चारच्या सुमारास देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
नरेंद्र सिंग असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. ते मूळचे पंजाब येथील असून देहूरोड मिलिटरी कॅम्प मध्ये राहत होते. आठ दिवसांपूर्वीच ते डीएमडी मिल्ट्री कॅम्पमध्ये रुजू झाले होते. याआधी ते दिल्लीत येथे कार्यरत होते, अशी माहिती देहूरोड पोलिसांनी दिली. अद्याप आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत.











