न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जुलै २०१९) :- प्रभाग क्र. १९ मधील श्रीधरनगर येथे पिंपरी चिंचवड महापालिकेचे उद्यान आहे. या उद्यानात अनेक दिवसांपासून ओपन जिम बसविण्याची नागरिकांकडून मागणी होत होती.
याबाबत प्रभागातील नगरसेवकांनी महापालिकेकडे पाठपुरावा करून, ओपन जिमच्या कार्यवाहीसाठी पूर्तता करण्याची मागणी केली. या मागणीला यश आले असून, महापालिकेने तातडीने कार्यवाही करीत, या उद्यानात ओपन जिमची उभारणी केली. त्याचे आज प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उद्यानातील ओपन जिममुळे प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

याप्रसंगी नगरसेवक शितल उर्फ विजय गोरख शिंदे, नगरसेवक शैलेश मोरे, सामाजिक कार्यकर्ते वसंत गावडे व सर्व मार्गदर्शक, ज्येष्ठ नागरीक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.















