न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जुलै २०१९) :- आठ वर्षीय मुलगा खेळण्यासाठी सायकल घेऊन बाहेर गेला. मुलगा बराच वेळ परतला नाही म्हणून त्याची शोधाशोध केली असता तो खड्ड्यात पडून पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली.
दापोडी येथे सैन्य अभियांत्रिकी महाविद्यालय (सीएमई) येथे गुरुवारी (दि. ४) रोजी ही घटना घडली. श्रीरंग किरण जोशी असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. तो इयत्ता तिसरीत शिकत होता. पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात त्याला हलविण्यात आले असता त्याचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.


















