न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जुलै २०१९) :- चिखली येथील आयआयबीएम कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना स्व-संरक्षणाचे धडे व त्यांना विविध गुन्ह्यांसंदर्भात माहिती व्हावी, यासाठी आज शनिवार (दि. ६) रोजी संस्थेच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी सर्व उपस्थित विद्यार्थी व विद्यार्थिनींना चिखली पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक शिंदे, उपनिरिक्षक घुगे (कुदळवाडी) यांनी विविध गुन्ह्यां संदर्भात माहिती देत वाहतुकीचे नियम, बाल गुन्हेगारी, कलम, शिक्षा व गुन्हा, वाढती सायबर क्राईम संख्या, रंगिंग तसेच विविध विषयांबाबत विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सखोल माहिती देत मार्गदर्शन केले.
मुलींच्या बाबतीत होणारे गुन्हे, त्यांची फसवणूक, मानसिक त्रास याबाबत आपण कसे राहिले पाहिजे, अनोळखी व्यक्तिवर किती विश्वास ठेवला पाहिजे, उदाहरणासहित पटवून देत, त्याबाबत त्यांना मार्गदर्शन केले. कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला स्वतःचे संरक्षण करता आले पाहीजे, असा संदेश त्यांनी दिला.
यावेळी पोलीस निरीक्षक शिंदे, उपनिरिक्षक घुगे, आयआयआयबीएम कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. धनंजय वर्णेकर, विभागप्रमुख अमोल भागवत, प्राध्यापक गिरीष काटे, प्राध्यापिका सौ. तेजस्विनी गायकवाड, मुकुल जोशी, सागर पाटील, प्रतिक्षा डफळ आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिटर गौम तर, आभार प्रदर्शन तेजस्विनी गायकवाड यांनी केले.
विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन व कायद्याविषयी जागृत करण्याचे काम आयआयबीएम कॉलेजचे विभागप्रमुख अमोल भागवत सर यांनी केले.















