न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जुलै २०१९) :- आकुर्डीतील काळभोरनगर येथे श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी विचार मंचच्या वतीने स्वर्गीय डाॅ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. स्वर्गीय डाॅ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करून, पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे, राजाभाऊ दुर्गे, माऊली थोरात, भिमा बोबडे, भाजपचे शहर सरचिटणीस प्रकाश जवळकर, शहर उपाध्यक्ष नंदू भोगले, दिपक कुलकर्णी, देवदत्त लांडे, प्रकाश हगवणे आदि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नगरसेवक मोरेश्वर शेडगे म्हणाले की, देशाची एकता व अखंडतेसाठी आपले बलीदान देणारे, कोट्यावधी भारतीयांचे प्रेरणास्थान, राष्ट्रभक्त, थोर शिक्षणतज्ज्ञ व जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांची जयंती संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. त्यांच्या स्मृतींना उजाळा
देत, भारतीय जनता पक्षाची जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करुन, पक्षाला बळकट करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे.















