न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने लोकशाहिर अण्णा भाऊ साठे प्रबोधन पर्वानिमित्त दरवर्षी विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.
यावर्षी या कार्यक्रमाचे पूर्वनियोजन करणेकामी महापौर राहूल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दि. ११ जुलै २०१९ रोजी दु. ३.०० वा. महापालिकेच्या कै. मधुकर पवळे सभागृहामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीस सर्व पदाधिकारी, अधिकारी, नगरसदस्य, सर्व पक्षांचे गटनेते व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांना निमंत्रीत करण्यात आले असून, सर्वांनी या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.


















