न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जुलै २०१९) :- संभाजीनगर भागातील नागरिकांचे प्रश्न, ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या स्मार्ट कार्डसाठी येणा-या अडचणी तसेच सोसायटीधारकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार ॲड गौतम चाबुकस्वार यांनी आज या भागात दौरा करून व्यथा जाणून घेतल्या.
येत्या दोन महिन्यात सर्व नागरी व सामाजिक प्रश्नांची सोडवणूक केली जाईल, असे ठोस आश्वासन आमदारांनी यावेळी त्यांना दिले. माजी महापौर मंगला कदम यांच्या पुढाकाराने या दौ-याचे आयोजन करण्यात आले होते. हा परिसर पिंपरी चिंचवड शहरातील स्मार्ट भाग म्हणून ओळखला जातो. सोसायटी व बंगलोधारकांनी हा भाग वेढला असून मुलभूत प्रश्नांबरोबर केंद्र व राज्य शासनाशी संबंधित प्रश्न व अडचणी जाणून घेत आमदार चाबुकस्वार यांनी येत्या ६० दिवसात तात्काळ सारे प्रश्न मार्गी लागतील, असे स्पष्ट केले.


















