न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०१९) :- राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहरातर्फे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
८०% व त्या पुढील गुण मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की आपली गुणपत्रिकेची झेरॉक्स गुरूवार दिनांक २५ जुलै २०१९ पर्यंत राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालय, साई कृपा भवन, खराळवाडी, पिंपरी पुणे ४११०१८ येथे सकाळी १०:३० ते सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत रामदास मोरे – ८६०५८०३७४०, कु. धनाजी तांबे ९६५७५८०६२० यांच्याकडे जमा करावेत, अशी माहिती शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी दिली.











