न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०१९) :- मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आयआरबी कंपनीचा ठेका संपत असल्याने या ठिकाणी काम करणाऱ्या तालुक्यातील स्थानिक कामगारांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग निर्मितीपासून स्थानिक भुमिपुत्र आयआरबी कंपनीकडे कामाला आहेत. कंपनीचा ठेका बंद झाल्यास आणि कामगारांच्या कामावर गडांतर येणार असल्याने कामाची शाश्वती मिळावी. नवीन ठेकेदार आल्यास कामगारांना कामावर कायम ठेवावे, या मागणीकरिता कालपासून स्थानिक १७९ कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
तरी आज शिवसेना मावळ तालुक्याच्या वतीने आंदोलन करणाऱ्या कामगारांची भेट घेऊन शिवसेना सदैव तुमच्या पाठीमागे ठाम उभी आहे, असा विश्वास देऊन तुमच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी तुमच्या बरोबर आहे. तसेच कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन उभारले जाईल, असे आश्वासन देऊन कामगार प्रतिनिधींना पाठिंब्याचे पत्र देण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख मा गजानन चिंचवडे, शिवसेना महिला आघाडी पुणे जिल्हा संघटक मा शादानभाभी चौधरी तालुकाप्रमुख राजेश खांडभोर,मा .सभापती शरदजी हुलावले उपतालुकाप्रमुख आशिष उर्फ गबलू ठोंबरे, मदन शेडगे, तालुका समन्वयक बाळासाहेब फाटक, विभाग संघटक एकनाथ जांभूळकर,युवा सेना उप जिल्हा प्रमूख गिरीश सातकर .चिटणीस विशाल हूलावळे .नितिन देशमुख . विभाग प्रमुख काळुराम हुलावळे, अवजड वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष हेमंत मेणे, शिव वाहतूक सेना उपजिल्हाध्यक्ष पंकज खोले, सरपंच सुनील येवले . उपशहर प्रमुख संजय भोईर क्रुष्णा शीलवने ,चंद्रकांत गाडे .महेश पिंगळे मनीष पवार, प्रसिद्धीप्रमुख विजय आखाडे, महिला आघाडी उपशहर संघटक प्रतिभाताई कालेकर, विभाग प्रमुख संजय शिंदे, मोहन मला उपविभाग प्रमुख रवींद्र टाकळकर, शाखाप्रमुख जितेंद्र ठोंबरे महिला आघाडी शाखा संघटक उर्मिला ताई शर्मा तसेच मोठ्या संख्येने कामगार बंधू भगिनी व शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते











