न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०१९) :- थेरगाव भागातील प्रभाग क्र. २३ व २४ मधील वीज पुरवठ्याच्या तक्रारी ताबडतोब सोडवाव्यात व डीपी बॉक्सची दुरुस्ती करावी. अन्यथा शिवसेना स्टाईलने महावितरणच्या कार्यालयावर आंदोलन करु व कार्यालयास टाळे ठोकू असा इशारा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक ॲड. सचिन भोसले यांनी महावितरणला दिला आहे.
महावितरणला दिलेल्या पत्रात भोसले यांनी म्हटले आहे की, थेरगाव परिसरात अनेक दिवसांपासून वीजपुरवठा कमी अधिक दाबाने खंडीत होत आहे. त्यामुळे अनेकांच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू नादुरुस्त झाले आहेत. तसेच प्रभाग क्र. २३ व २४ मधील अनेक ठिकाणचे डीपी बॉक्सची दुरावस्था झाली आहे. ठिकठिकाणी उभारलेल्या रोहित्रांच्या बॉक्समध्ये वेली व झुडपे वाढली आहे. त्यामुळे तेथे अपघात होण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. त्याची ताबडतोब दुरुस्ती करावी व वीजपुरवठा सुरळीत व नियमित करावा. अन्यथा शिवसेना स्टाईलने महावितरणच्या कार्यालयावर आंदोलन करु व कार्यालयास टाळे ठोकू असा इशारा ॲड. भोसले यांनी दिले आहे.















