न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०१९) :- महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. हेमंत बाबासाहेब तापकीर यांनी बुधवार (दि. ६) रोजी पाच लाखांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिला. या रकमेचा धनादेश तापकीर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे. या योगदानाबद्दल मुख्यमंत्री यांनी तापकीर यांचे आभार मानले.
याप्रसंगी डॉ. हेमंत तापकिर यांचे कौतुक व अभिनंदन करताना शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारीसंघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले म्हणाले की, समाजाच्या हितासाठी व समाजपयोगी कामे करण्यासाठी या निधीच्या माध्यमातून शासनाला मोठा हातभार लागणार आहे. तापकीर यांचा नेहमीच समाजिक कार्यात हिरारीने सहभाग असतो. त्यांच्या दानशूरपणामुळे अनेकांना मदतही झाली आहे.











