न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०१९) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कचरा वाहतूक करणा-या खासगी ठेकेदाराच्या वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील पाच वर्षाचा बालक दगावला. तर, वडील मृत्यूशी झुंज देत आहेत.
या अपघातामुळे नातू गमावलेल्या आणि मुलाचा मृत्यूशी संघर्ष पाहणा-या आईने महापालिकेत येऊन टाहो फोडला. गंभीर जखमी असलेल्या मुलाला वाचवा, अशी आर्त याचना प्रशासनाकडे केली. ही घटना आज (शुक्रवारी) दुपारी चारच्या सुमारास महापालिका मुख्यालयासमोर घडला.
अर्णव शिवशंकर सोलबने (वय ५ वर्षे रा. नागेश्वरनगर, मोशी) असे अपघातात मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. तर, वडील शिवशंकर सोलबने हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मोशी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी कचरागाडीवरील चालक सचिन सुदाम कांबळे (वय २८, रा. मोरेवस्ती, चिखली) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.