न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २१ जुलै २०१९) :- प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न हायस्कूल शिवाजीनगर पुणे येथे इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थीचा समारंभ पार पडला. यावेळी प्रशालेचे माजी विद्यार्थी आणि संस्थेचे आजीव मंडळाचे सदस्य डॉ. दिग्विजय एकबोटे यांनी मेडिकल क्षेत्रातील सुपर स्पेशालिस्ट प्रवेश परीक्षेत संपुर्ण भारतात ५ वा क्रमांक मिळविल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी डॉ. एकबोटे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, मातृभाषेतील शिक्षण महत्त्वाचे असून मुलांनी वाचन केले पाहिजे. मोबाईलचा वापरापासून दूर राहून एकाग्रतेने अभ्यास केल्यास यश प्राप्त होते. आपल्या जीवनामध्ये आपल्या आईवडिलांचा तर वाटा असतोच पण शिक्षकांचाही वाटा महत्त्वाचा असतो. त्यामुळेच विद्यार्थी घडतात.
प्रमुख पाहुणे पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपतराव मोरे म्हणाले, संस्कारशील विद्यार्थी बनवा दहावीच्या निकालापेक्षा नववीच्या निकालाची गुणवत्ता वाढली पाहिजे.
यावेळी व्यासपीठावर शाळेचे व्हिजिटर उद्धव खरे, संस्थेच्या सदस्या मृगजा कुलकर्णी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका संगीता लकारे, उपमुख्याध्यापिका रोहिणी काळे, पर्यवेक्षिका सीमा कुळधरण, उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका लकारे यांनी केले. विद्यार्थीयादी वाचन ईशानी ढेरे यांनी केले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नारळ, पुष्पगुच्छ ,ट्रॉफी देऊन करण्यात आला.
सूत्रसंचालन नवेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे आभार निवृत्ती गोपाळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्या वाईकर, सुमिता पाटील, खंडू खेडकर, प्रमोद शिंदे, स्मिता पवार, दादाभाऊ शिनलकर, गणपत नांगरे, यांनी सहकार्य केले.या उपक्रमाचे कौतुक प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे व सहकार्यवाह ,नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांनी केले.


















