न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जुलै २०१९) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समितीतील सदस्यांचा एका वर्षांचा कार्यकाळ ८ जुलै रोजी संपला आहे. त्यामुळे या सदस्यांच्या जागी या समितीत सत्ताधारी भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेच्या एक अशा नऊ सदस्यांची आज गुरुवार (दि. २५) रोजी महासभेत निवड करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या सदस्यपदासाठी भाजपकडून नगरसेविका चंदा लोखंडे, निर्मला गायकवाड, मनिषा पवार, नगरसेवक सागर गवळी, शशिकांत कदम तर, राष्ट्रवादीकडून नगरसेविका वैशाली काळभोर, सुलक्षणा शिलवंत-धर, नगरसेवक भाऊसाहेब भोईर तसेच शिवसेनेकडून रेखा दर्शिले यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.











