न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०१९) :- अभिनेत्री परिणीती चोपडा व अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांचा आगामी चित्रपट ‘जबरिया जोडी’ या चित्रपटाच्या प्रमोशन निमित्ताने संत तुकाराम नगर पिंपरी येथील डॉ .डी. वाय पाटील विद्यापीठाला भेट देवून विद्यार्थ्यांसोबत ठुमके लावले. परिणीती व सिद्धार्थ यांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी विद्यापीठात गर्दी केली होती.
संत तुकाराम नगर, पिंपरी येथील डॉ .डी. वाय पाटील विद्यापीठात “जबरिया जोडी” या चित्रपटाच्या प्रमोशनकरिता अभिनेत्री परिणीती व अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांनी बुधवारी दुपारी भेट दिली. यावेळी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी त्यांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. परिणीती व सिद्धार्थ विद्यापीठात येताच सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या शिट्या वाजवून जल्लोषात त्यांचे स्वागत केले. यावेळी जबरीया या चित्रपटाबद्दल सिद्धार्थने विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. ‘जबरिया जोडी’ च्या गाण्यावर दोघांनी विद्यार्थ्यांसमवेत नृत्य सादर केले. त्यांचे नृत्य मोबाईल कॅमेऱ्यात टिपण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी विद्यार्थ्यांना चित्रपटाचे प्रमोशन करणारे टी-शर्टचे देखील वाटप करून येत्या ९ ऑगस्ट रोजी ‘जबरिया जोडी’ सर्वत्र प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट सर्वांनी पाहावा यासाठी अभिनेत्री परिणीती चोपडा यांनी सर्वांना आवाहन केले.
डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कोषाध्यक्ष व ट्रस्टी डॉ यशराज पाटील व पत्नी यशश्री पाटील यांनी अभिनेत्री परिणीती चोपडा व अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांचे स्वागत केले व त्यांच्या ‘जबरिया जोडी’ या चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या.











