न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ ऑगस्ट २०१९) :- महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे प्रदेश संघटक सचिव कै. सुदाम मुक्तीराम बनसोडे, वय वर्ष ५०, यांचे आकस्मित निधन झाले. सुदाम बनसोडे हे रिक्षा संघटनेचे कार्यकर्ते होते.
रिक्षा चालकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनामुळे रिक्षा विश्वाचे मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांचे ते मोठे दाजी होत.
त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. मराठवाडा येथिल परभणी जिल्यातील रेणापूर हे त्यांचे मूळ गाव. गेली ३० वर्षापासून ते जाधववाडी चिखली येते राहत होते.


















