न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ ऑगस्ट २०१९) :- चऱ्होलीतील प्रगतशील शेतकरी सुरेश आण्णा ज्ञानेश्वर तापकीर यांचे अल्पशा आजाराने नुकतेच दु:खद निधन झाले. ते अगदी मृदू स्वभावाचे होते. त्यामुळे त्यांच्या जाण्याने समस्त पंचक्रोशीवर दुःखाचे सावट पसरले आहे.
त्यांचा दशक्रिया विधी रविवार (दि. ४) रोजी सकाळी ८.३० वा. इंद्रायणी नदीकाठी, आळंदी देवाची येथे होणार आहे. चऱ्होलीतील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप आबा तापकीर यांचे ते वडिल तर, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका विनया प्रदीप तापकीर यांचे सासरे होत.












