न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ ऑगस्ट २०१९) :- औंध रोड चौकाजवळील ओढ्याच्या कडेला पांढऱ्या रंगाचे गोड्या पाण्यातील “इंडियन फ्लॅपशेल’ जातीचे कासव आढळले. एका विद्यार्थ्याने प्रसंगावधान राखल्याने या कासवाला जीवनदान मिळाले.
जवळची दोन-तीन मुलं त्या कासवाला दगड मारत होती. ते एकाने पाहिले, दगड मारणारी मुलं ऐकणारी नव्हती म्हणून पटकन ते कासव पकडून घरी घेऊन आला.
घरी आल्यावर विनायक यांनी झालेला प्रकार त्यांचे शेजारी संजय गायकवाड यांना सांगितला. गायकवाड यांना कासवाबद्दल माहिती नसल्यामुळे त्यांनी अलाईव्हचे सदस्य व सर्पमित्र राजेंद्र कांबळे यांना संपर्क केला.












