न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ ऑगस्ट २०१९) :- हॉटेलमध्ये जेवण करताना एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून वाद झाला. यामध्ये एका तरुणावर कोयत्याने वार केले. ही घटना बुधवारी रात्री अकराच्या सुमारास काळेवाडी येथे बैठक हॉटेलमध्ये घडली.
राहुल अशोक घोडेश्वर यांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली, त्यानुसार जगदीश नढे आणि त्याच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












