न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ ऑगस्ट २०१९) :- माझ्या राजकीय जीवनात पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी सोपवली ती मी यशस्वीपणे पार पाडण्याचे काम केले आहे. मी आजवर कोणत्याही पदासाठी इच्छुक किंवा दावेदार नव्हतो. मात्र, माझ्या कामाच्या जोरावर मला महत्वाची पदं मिळत गेली.
त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची संधी दिल्यास मी ती का सोडेन असे विधान महसूलमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चंद्रकांत पाटीलही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने आयोजित वार्तालापात ते बोलत होते.












