न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ ऑगस्ट २०१९) :- बंदी असतानाही गुटखा विक्री केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका विक्रेत्यास अटक करण्यात अली आहे. त्याच्याकडून एका टेम्पोसह १० लाख ३३ हजार ५० रुपयांचा गुटखा, सुगंधित तंबाखू आदी मुद्देमाल जप्त केला आहे.
पिंपरीगावातील पवनेश्वर मंदिर चौकात गुरुवारी (दि. १) सकाळी साडेसातच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेमचंद रामचंद कृपलाणी (वय ५०), व दिनेश तुलसीमल तीरथाणी (दोघेही रा. पिंपरी), अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी खेमचंद कृपलाणी याला पोलिसांनीअटक केली आहे. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अरुण श्रीराम धुळे (वय ५५, रा. कोथरुड) यांनी फिर्याद दिली आहे.















