न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ ऑगस्ट २०१९) :- पिंपरीतील मोरवाडी परिसरात आयटीआयला लागून महापालिका आयुक्त बंगला ते न्यायालयाच्या ९०० मीटर अंतराच्या रस्ता दुभाजकात बकुळीची ९१ झाडे लावली होती. ही झाडे अशास्त्रीय पद्धतीने व चुकीच्या ठिकाणी लागवड केल्याने १९ झाडे जळाली आहेत.
महापालिकेच्या बेजबाबदारपणामुळे बकुळीचं झाड जळालं, असे म्हणण्याची वेळ आली आहे. आयुक्तांच्या बंगल्यासमोरील दुभाजकातील झाडेही जळाली आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि उद्यान विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.















