न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ ऑगस्ट २०१९) :- ई. व्ही. एम. हटाओ, आर. टि. आय बचाओ जनआंदोलन समिती पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने रविवार दि. ४ ऑगस्ट २०१९ रोजी आचार्य अत्रे रंगमंदिर, संत तुकारामनगर, पिंपरी या ठिकाणी सकाळी १० वाजता परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत मानव कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या परिषदेत डॉ. विश्वंभर चौधरी केंद्र सरकारने माहिती अधिकार कायद्यात केलेला बदल नेमका कशासाठी? या विषयावर तर अॅड. असीम सरोदे, ई. व्ही.एम.सरकारचा माहिती अधिकार कायद्यावर हल्ला या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
या परिषदेला विश्व कल्याण कामगार संघटनेचे दिलीप पवार, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे किशोर ढोकले, राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे, काँगेसचे सचिन साठे, भारिपचे देवेंद्र तायडे, एमआयएमचे अकिल मुजावर, मनसेचे सचिन चिखले, शेकापचे नितीन बनसोडे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. गणेश दराडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्ता सायकर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. व्ही. व्ही. कदम, डॉ. सुरेश बेरी, आपचे प्रकाश पठारे, प्रकाश जाधव, आनंदा कुदळे, प्रदिप पवार, गिरीष वाघमारे, क्षितीज मानव, अॅड. मोहन अडसुळ, काशिनाथ नखाते, सतिश काळे, धनाजी येळकर, अभिमन्यू पवार, प्रल्हाद कांबळे, प्रभाकर माने, उमेश सणस, क्रांतीकुमार कडूलकर, जगन्नाथ आल्हाट, सचिन देसाई, डॉ. भास्कर बच्छाव, हरिश तोडकर, सिददीक शेख, अशोक भडकुंबे, राजु वारभुवन, स्वप्नील कांबळे, सतिश गायकवाड शहरातील विविध सामाजिक संघानांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती जनआंदोलनाचे मुख्य समन्वयक मारूती भापकर यांनी दिली.














