न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ ऑगस्ट २०१९) :- पिंपरी चिंचवड दर्शन बस सेवेचा उदघाटन समारंभ शनिवार दि ३ ऑगस्ट २०१९ रोजी दुपारी ३ वाजता अण्णाभाऊ साठे बस टर्मिनल, भक्ती शक्ती चौक,निगडी येथे आयोजित करण्यात आले असल्याचे महापौर राहूल जाधव यांनी सांगितले.
ना. श्री रामदासजी आठवले, राज्यमंत्री सामाजिक न्याय तथा अधिकारीता, भारत सरकार यांचे शुभ हस्ते संपन्न होणा-या कार्यक्रमास पुणे जिल्हा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील शहारातील सर्व सन्मानीय खासदार, सन्मानीय आमदार, महानगरपलिकेचे सर्व सन्मानीय पदाधिकारी नगरसेवक व नगरसेविक तसेच पुणे परिवहन महामंडाळाचे सर्व सन्मानीय संचालक, मा. आयुक्त, पुणे परिवहन महामंडाळाच्या अध्यक्षा आदि मान्यवर उपस्थित राहणार असुन सदरचा उदघाटन सोहळा मा. महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेच्याखाली संपन्न होणार आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपलिकेने सन २०१८-मध्ये शहर परिवर्तन कार्यलयाच्या अंतर्गत शहरासाठी २०३० करिता शहर परिवर्तन आरखडा तयार केला असुन या धोरणाच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड दर्शन बस सेवा नागरिकांसाठी सुरु करण्यात येत आहे. दर्शन बस सेवेमुळे पिंपरी चिंचवड शहरातील व आसपासच्या परिसरामधील अनेक ऐतेहासिक स्थळांची ओळख पर्यटकांना व नागरिकांना करुन देणे ही दर्शन बस सेवा सुरु करण्यामागची भुमिका असल्याचेही त्यांनी सांगितले















