न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ ऑगस्ट २०१९) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समिती सभापतीपदासाठीचा पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार येत्या सोमवारी (दि. ५) रोजी दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत नामनिर्देशन पत्रे स्वीकारली जाणार आहेत.
९ ऑगस्ट २०१९ रोजी दुपारी बारा वाजता महापालिका मुख्यालयातील महापौर मधुकरराव पवळे सभागृहात सभापतीपदासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल कामकाज पाहणार आहेत. या समितीत भाजपचे वर्चस्व असल्यामुळे सभापती व उपसभापती भाजपचाच होणार आहे.















