न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ ऑगस्ट २०१९) :- पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात ९२ टक्के पाणीसाठा झाला आहे. पावसाने दडी मारल्याने महिन्यापूर्वी चिंता निर्माण झाली असताना नंतरच्या काळातील समाधानकारक पावसाने दिलासा मिळाला. आज शुक्रवारी पवना धरण ९२ टक्के भरले आहे.
पवना नदी दुथडी भरुन वाहत आहेत. यापुढे धरणात येणारा पाऊस (येवा) नुसार धरणातून विसर्ग सोडावा लागणार आहे. त्यामध्ये धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यास नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढेल. त्यामुळे नदी किनारील नागरिकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.















